Sun. Apr 28th, 2024

फोर्ड इंडीवर नवीन स्वरूपात मार्केटमध्ये दाखल जाणून घ्या फीचर्स

By Abhi Mar 21, 2024

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की आता काही दिवसांपूर्वी फोर्ड कंपनी ही भारतातून निघून गेली होती. परंतु आता फोर्ड कंपनी परत एकदा भारतामध्ये येणार आहे. फोर्ड कंपनी ही चार चाकी गाड्या बनवण्यामध्ये खूप फेमस आहे. फोर्ड कंपनीची सर्वात फेमस असणारी भारतामधील गाडी म्हणजे फोर्ड इंडीवर.

ही गाडी राजकीय लोकांची गाडी म्हणून खूपच फेमस होती. या गाडीला तगडा आव्हान म्हणजे फॉर्च्युनर ही देत होती. ही गाडी भारतात न गेल्यापासून फॉर्च्युनर ची विक्रीमध्ये मोठी तेजी आली होती . परंतु आता फोर्ड कंपनीने परत एकदा भारतामध्ये वापस येऊन, ही गाडी नवीन स्वरूपात मार्केटमध्ये दाखल केलेली आहे. या गाडीबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

Features फीचर्स

जर तुम्ही या गाडीची समोरचे साईड पाहिली तर समोरच्या साईडला फोड कंपनीचा लोगो, लोगो च्या आजूबाजूला ग्रील देण्यात आलेला आहे. आणि वरच्या साईडला एव्हरेस्ट नावाची अक्षर देण्यात आलेली आहेत. या गाडीमध्ये तुम्हाला समोरच्या साईडला एलईडी हेड लॅम्प देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये समोरच्या लाईट्स एलईडी हेडलाईनचे मॉडेल नुसार बदलतात. तसंच हेडलाईट सोबत आलोय ची डिझाईन सुद्धा मॉडल नुसार बदलते.

इंडीवर या गाडीमध्ये टायटॅनियम, स्पोर्ट आणि वाईल्ड ट्रॅक हे तीन मॉडेल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या गाडीमध्ये तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये डोअर हँडल देण्यात आलेले आहेत. तसेच साईड मिरर सुद्धा तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये देण्यात आलेले आहेत. समोरचे हेडलाईन्स बद्दल डिटेल बोलायचं झालं तर सर्वात वरच्या बाजूने तुम्हाला ORM  देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आत मध्ये टर्न घेण्यासाठी इंडिकेटर्स नंतर हेडलाईन्स देण्यात आलेले आहेत. तसेच खालच्या साईडला तुम्हाला एलईडी फॉग लॅम्प देण्यात आलेले आहेत.

समोरून पाहिले तर गाडीचा आकार खूप मोठा दिसतो. तसेच तुम्हाला समोरच्या साईडला पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आलेले आहेत. पार्किंग सेन्सर च्या वरती गाडीचे नंबर प्लेट लावण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 20 इंच आलाय व्हील देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये तुम्हाला मोठ्या साईजचे ओआरएम देण्यात आलेले आहेत. तसेच त्यावर एलईडी लाईट आणि 360 कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे. समोरच्या साईडच्या दरवाजावर तुम्हाला गाडीच्या मॉडेल चे नाव दिसेल स्पोर्ट टायटॅनियम वाइल्ड अशाप्रकारे.

Exterior Design गाडीची एक्सटीरियर डिझाईन

मागच्या साईट बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही साईडने तुम्हाला एलईडी टेल लॅम्प देण्यात आलेले आहेत. तसेच तुम्हाला फोर्ड कंपनीची ब्रँडिंग च नाव सुद्धा दिसेल. त्यानंतर खाली एवरेस्ट म्हणून असं इंग्लिश अक्षरांमध्ये लिहिलेले नाव दिसेल. त्याखाली तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिसेल आणि मागच्या साईडला पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आलेला आहेत आणि 360 कॅमेरासाठी आणि रिव्हर्स गाडी घेण्यासाठी बॅक कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे.

गाडीच्या डिक्कीची बोटस्पेशची गोष्ट करायची झाल्यास यामध्ये तुम्हाला पावर्ड टेल गेट मिळतो. मागच्या साईडचे सीड्स फोल्ड करण्यासाठी इलेक्ट्रिक बटन देण्यात आलेला आहे. तसेच मागे डिकी मध्ये काही सामान ठेवण्यासाठी देण्यात आलेला आहे. तुम्हाला जॅक अँड टूलकिट सुद्धा देण्यात आलेले आहे. मागच्या साईडला तुम्हाला 12V होल्ट चार्जिंग सॉकेट सुद्धा देण्यात आलेला आहे. जे पॅसेंजर सर्वात मागच्या साईडला बसतील त्यांच्यासाठी कप फोल्डर सुद्धा देण्यात आलेले आहेत. तसेच मागे बसलेल्या लोकांसाठी एसीची सुविधा म्हणून वरच्या साईडला टॉपला सुद्धा एसे देण्यात आलेला आहे.

Interior Design आता आपण इंटरियर बद्दल बोलूया.

ड्रायव्हर साईट गेटला तुम्हाला सर्व कंट्रोल देण्यात आलेले आहेत. चारी पावर विंडोजचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. तसेच तुम्हाला साईडलाईट ऍडजेस्ट करण्यासाठी ओआरएम कंट्रोल देण्यात आलेले आहेत. लॉक अनलॉक करण्यासाठी बटन आहेत. या गाडीमध्ये तुम्हाला डिजिटल स्पीडोमीटर पाहायला मिळतो.

डिजिटल स्पीडोमीटर मध्ये तुम्हाला स्पीड, टायर प्रेशर या गोष्टी डिजिटल स्वरूपात दिसतील. तसेच साईडला तुम्हाला इंडिकेटर दिसेल. या गाडीमध्ये तुम्हाला स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला जीपीएस सिस्टीम सुद्धा देण्यात आलेला आहे.

या गाडीमध्ये तुम्हाला एसी कंट्रोल से डिजिटल आणि मॅन्युअल दोन्ही पद्धतीने हँडल करू शकता. समोरच्या स्क्रीनवर तुम्हाला 360 कव्हरेज दिसेल. या इम्पॉर्टंट सिस्टीमला तुम्ही फोन कनेक्ट करून सर्व सिस्टीम ऑपरेट करू शकता. या सिस्टीम मध्ये अँड्रॉइड अँड ॲपल कार प्ले दोन्ही गोष्टी सपोर्टेड आहेत.

Safety Features सेफ्टी फीचर्स

या गाडीमध्ये तुम्हाला Adas सिस्टीम देण्यात आलेले आहे जेणेकरून तुम्ही गाडी रिव्हर्स घेताना तुम्हाला सांगेल, तसेच टर्न घेताना सुद्धा तुम्हाला सांगितल्या जाईल. टर्न घेता वेळेस अचानक गाडी आल्यानंतर ह्या गाडीमध्ये वार्निंग देण्यात येईल. तसेच या गाडीमध्ये ड्रायव्हर अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला डेली यूज फीचर आणि प्रॅक्टिकल फीचर्स देण्यात आलेले आहेत. समोरच्या साईडला तुम्हाला वायरलेस चार्जर देण्यात आलेला आहे. तसेच समोरच्या साईडला टाइपसी आणि यूएसबी पोर्ट देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये तुम्हाला सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते.

तसेच या गाडीमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्हीही पद्धतीने गाडी चालू शकते त्यासाठी वेगळी बटन्स देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सुद्धा देण्यात आलेला आहे. सेंटर कन्सोल साठी जागा मोठ्या प्रमाणात आहे. तसेच त्यामध्ये 12 V चार्जिंग पोर्ट सुद्धा देण्यात आलेल आहे. समोरच्या साईडला डॅशबोर्ड मध्ये सॉफ्ट टच वापरण्यात आलेला आहे या गाडीमध्ये बिग साईज इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आलेली आहे जी की या गाडीचे मुख्य आकर्षक गोष्ट आहे.

या गाडीमध्ये तुम्हाला पॅनोरमिक सन रूफ पाहायला मिळेल. मागच्या सीटवर बसण्यासाठी तुम्हाला क्रॅब हँडल देण्यात आलेल्या गाडीची हाईट उंच असल्यामुळे तुम्हाला ते हँडल पकडून गाडीमध्ये चढाव लागेल तसेच मागच्या साईडला तीन जण बसण्याची कॅपॅसिटी देण्यात आलेला आहे. मागच्या सेटवर्स तुम्हाला दोन सेटच्या मध्ये हॅन्ड्रेस्ट देण्यात आलेला आहे. मागच्या साईडला बसण्यात येणारे तिन्ही लोकांसाठी हे ड्रेस देण्यात आलेला आहे. मागच्या साईडच्या लोकांसाठी सेंटरमध्ये एसी कंट्रोल चार्जिंग पोर्ट आणि थ्री पिन पोर्ट अशा सुविधा आहेत

By Abhi

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *