Sat. Apr 27th, 2024

Power of Self discipline : स्वयंशिस्ती चे महत्व

By Abhi Feb 20, 2024
Power of Self disciplinePower of Self discipline

Power of Self discipline : नमस्कार मित्रांनो आज आपण स्वयं ( शिस्त सेल्फ डिसिप्लिन ) हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे आणि जर आपण सेल्फ डिसिप्लिन ठेवला स्वयंशिस्त बाळगली तर, आपण आयुष्यात काय काय मिळू शकतो. या संदर्भात माहिती घेणार आहोत. आणि स्वयंशिस्त कशी लावायची आणि तिचे किती फायदे आहेत. या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर पाहूया.

एकदा एका मुलाला खूप श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीच्या घरी जाण्यासाठी चान्स मिळतो. त्या घरामध्ये दिसणाऱ्या महागड्या वस्तू पाहून, तो त्या घरमालकाला विचारतो की तुम्ही एवढी श्रीमंती कशी मिळवली. तुमच्याकडे असलेले मोठे घर विविध, मोठमोठ्याला गाड्या, स्विमिंग पूल, गार्डन या एवढे सारे आयुष्यात मिळवण्याचा रहस्य काय.मुलगा त्या श्रीमंत माणसाकडे विनंती करतो की, मला तुमच्या श्रीमंतीचे रहस्य सांगा. परंतु श्रीमंत माणूस म्हणतो की, मी तुला सांगेल पण माझं सांगण्याचा मार्ग तुला आवडणार नाही. तर काय करायचे. तर मुलगा परत म्हणतो की नाही तुम्ही सांगा मी ऐकेल. मग तो श्रीमंत माणूस त्या मुलाला स्विमिंग पूल च्या शेजारी घेऊन जातो. स्विमिंग पूल च्या जवळ गेल्यानंतर तो श्रीमंत माणूस त्या मुलाला पाण्यामध्ये डोकावून पाहण्यासाठी सांगतो. जेव्हा तो मुलगा पाण्यात डोक वाकून पाहतो, तेव्हा श्रीमंत माणूस वरून त्याचा डोकं धरून त्या पाण्यामध्ये बुडवतो आणि थोडा वेळ तसेच दुरून नंतर त्याला बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर मुलगा खूप चिडतो आणि श्रीमंत माणसाला विचारतो. तुम्ही असं का केलं माझ्यासोबत अशाने मी तर मेलो असतो.

श्रीमंत माणूस पुढे म्हणतो, हेच आहे माझ्या श्रीमंत होण्याचे रहस्य. मुलगा थोडा गोंधळून जातो. त्यावर श्रीमंत माणूस त्याला समजून सांगतो की, जेव्हा तुझे डोके पाण्यात होते, तेव्हा तुला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची गरज होती ती म्हणजे श्वास. जेव्हा तुझे डोके पाण्यात होते, तेव्हा तुला श्वासाची सर्वात जास्त गरज होती. त्याचप्रमाणे जेव्हा तू तुझ्या आयुष्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी सोडून फक्त आणि फक्त यशस्वी होण्यासाठीच धडपडशील तेव्हा तुला यश मिळेल. अशा गोष्टी ऐकल्याने बरेच लोक खूप मोटिवेट होतात. खूप ऊर्जा आणि ठरवतात की मी पण आता सक्सेसफुल होणार. मी व्यायाम करणार, मी दररोज लवकर उठणार, मी पुस्तक वाचणार. पण दोन-तीन दिवस या गोष्टी केल्यानंतर परत माणूस दररोजच्या जीवनात सारख्याच गोष्टी करायला लागतो.

मित्रांनो आयुष्यात फक्त मोटिवेशन असूनच, काही उपयोग होत नाही. हा मोटिवेशन तुम्हाला गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. परंतु या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी आणि दीर्घकालीन टिकवण्यासाठी तुम्हाला आयुष्यामध्ये स्वयंशिस्त असं खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो आज आपण त्याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत, की स्वयंशिस्त कशी पाळायची. तर या संदर्भात ब्रेन ट्रेसी या नामक व्यक्तीने एक पुस्तक लिहिलेला आहे “नो एस्क्युजेस दि पावर ऑफ सेल्फ डिसिप्लिन” तर याच पुस्तकाच्या मदतीने आपण एक एक गोष्ट समजून घेऊया.
या पुस्तकामध्ये लेखकाने तीन सोप्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या आपण पाहू. तीन आरचा R_R_R फॉर्मुला देण्यात आला.

R- Reason  पहिली गोष्ट आहे रिजन कारण

तर श्याम नावाचा एक मुलगा एका शहरांमध्ये राहत असतो. आयुष्यात तो खूप परेशान असतो आणि त्याचं वय हे वीस वर्षेच असतं. आणि त्याला वडीलही नसतात. तो आईसोबत आणि बहिणीसोबत राहत असतो. श्यामला वडील नसल्याने त्याच्यावर कोणी धाक ठेवायला नसल्याने तो वाईट संगतीमध्ये पडतो. त्याच्या आईचं पण तो जास्त ऐकत नाही. तो त्याच्या मित्रांसोबत दारू पिणे, सिगरेट ओढणे, पब मध्ये जाऊन पार्टी करणे अशा गोष्टी करू लागतो.  श्यामच्या अशा वागण्याने त्याची आई खूप टेन्शन घेऊन आजारी पडते. त्याच्या आईला दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर आता संपूर्ण घराची जबाबदारी आणि काम करण्याची जिम्मेदारी श्याम वर आली. याच आजारपणामध्ये श्यामच्या आईचे निधन होतं आणि त्याच्या छोट्या बहिण आणि घराच्या जिम्मेदारी श्याम वर येते.

Power of Self discipline
Power of Self discipline

निधनाच्या पहिले त्याच्या आईने त्याला समजून सांगितले होते की, आता माझ्या निधनानंतर तुला घराची संपूर्ण जिम्मेदारी सांभाळायचे आहे. तुझ्या छोट्या बहिणीलाही तुला सांभाळायचे आहे. या सर्व वाईट सांगती, वाईट सवय तू सोडून दे. आईच्या निधनानंतर श्याम ठरवतो की, मी या सर्व गोष्टी सोडून देणार. तो लगेच आता नोकरी शोधतो. तो साफसफाईची नोकरी करण्यास चालू करतो. तो आता दोन-तीन ठिकाणी नोकरी करून सकाळी शाळेमध्ये पण जात असतो. तो आता नवीन नवीन गोष्टी शिकायला ही चालू करतो. बाहेर करत असलेल्या अवघड कामांमुळे साफसफाई करणे इत्यादी गोष्टींमुळे त्याला आता अभ्यास करणे सोपे वाटू लागले. या सर्व कामांबरोबरच तो आता घर ही सांभाळत होता. घरामध्ये स्वयंपाक करणे, झाडून घेणे, कपडे धुणे या सर्व गोष्टींची काळजी घेऊ लागला. यामध्येच त्याला पुढे तो डिग्री मिळवतो. एक छान नोकरी त्याला मिळते. नंतर येणाऱ्या काळात तो त्याच्या बहिणीचे लग्न करून देतो. तर मित्रांनो आपल्याला या गोष्टी म्हणून काय शिकायला मिळाले….

तर मित्रांनो आधी तो वाईट संगतीमध्ये सवय मध्ये पडला होता. तो कोणती जिम्मेदारी घेत नव्हता. परंतु त्याच्या आईच्या निधनानंतर त्याच्याकडे संपूर्ण जिम्मेदारी आली. बहिणीची जिम्मेदारी आली आणि तिथे कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने त्याला ते करण भागत होतं. त्यामुळे त्याने स्वतःला आयुष्यात बदललं.

याचाच अर्थ असा की, आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी करण्यासाठी एक स्ट्रॉंग असे कारण पाहिजे. मोठे कारण पाहिजे जेणेकरून तुम्ही  तिथं कोणतेच काम न करण्याचे कारण देऊ नाही शकणार.
जेव्हा तुमच्याकडे कोणताच ऑप्शन उरत नाही. तेव्हा तुम्ही काम करतातच. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या आयुष्यात असं कारण शोधा की जेणेकरून तुम्हाला ते करायचं आहे.
मित्रांनो जर तुम्हाला आयुष्य मध्ये श्रीमंत व्हायचं असेल काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं कारण शोधावं लागेल. की मला का पैसे कमवायचे आहेत, मला मोठा व्हायचा आहे, जेव्हा तुमच्याकडे मोठं कारण असल पाहिजे.

R-Research  दुसरा म्हणजेच रिसर्च करणे

जेव्हा तुम्हाला काहीतरी करण्यासाठी एक मोठे कारण भेटल, त्यानंतर पुढची स्टेप येते त्याबद्दल माहिती गोळा करणे म्हणजेच रिसर्च करणे. पुस्तकाचे लेखक हे दातांचे डॉक्टर असल्याने ते विविध पुस्तके, विविध सेमिनार या सर्व गोष्टी ऐकत बघत वाचत होते. त्यांना नव नवीन गोष्टी शिकणे खूप आवडत होतात. एकदा जेव्हा ते शिकवण्याच्या कॉन्फरन्स ला गेले असताना, तेव्हा तिथे त्यांना जपानी डॉक्टर भेटतो. जपानी डॉक्टर कडून ते दात नवीन कसे बनवायचे यासंदर्भात माहिती घेतात आणि जेव्हा लेखक परत अमेरिकेत येतात आणि ही टेक्निक तिथल्या लोकांना वापरून बघतात. तेव्हा त्यांचा आयुष्य संपूर्ण बदलून जातं. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती शोधत जातात. तेव्हा तुम्हाला काहीतरी उत्तर मिळून तुम्ही ते उत्तराला आधार घेऊन पुढे काम करत राहिलात तरच तुम्हाला नक्कीच यश मिळते.

Power of Self discipline
Power of Self discipline

लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी बसून राहिल्याने एका मुलाचे वजन खूप वाढते. तो काही दिवस वजन कमी करण्यासाठी जिमला जातो. व्यायाम करतो. परंतु काही दिवसानंतर तो जिमला जाणं बंद करतो आणि घरीच बसून राहतो. त्याचे परत वजन वाढू लागतात. तर मग तो आता मोटिवेट न होता वजन कमी कसं करायचं याबद्दल रिसर्च करायला लागतो, पुस्तके वाचतो. व्हिडिओज बघतो यूट्यूबला बघतो, इंस्टाग्राम वर माहिती शोधतो आणि अशा लोकांमध्ये राहतो ज्यांना फिटनेस ची काळजी खूप आहे. असं करून हळूहळू तो त्याचे वजन घटवतो आणि वजन घट कसे घटवा या संदर्भात संपूर्ण माहिती गोळा करतो.

R-Reptation  तिसरा आर म्हणजे रिपीटेशन

1900 शतकामध्ये हेन्री स्टॅन्ली यांनी काँगो नदीचा नक्शा बनवला होता. नक्शा बनवण्यासाठी त्यांना या नदीतून 999 दिवस प्रवास करावा लागला होता. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत 224 लोक होती. पण जेव्हा प्रवास संपला तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 114 लोकं उरली. त्या काळामध्ये स्टॅन्लीला सर्वात स्वयंशिस्त असणारा माणूस म्हणून ओळखले जात होते. मित्रांनो स्टॅन्ली यांना दररोज सकाळी उठून दाढी करण्याची सवय होती. किती वाईट परिस्थिती असली तरी ते रोज उठून जंगलामध्ये दाढी हे करतच होते. ते एकही दिवस खाडा पडू देत नव्हते.

Power of Self discipline
Power of Self discipline

स्टॅन्ली या रोज दाढी करण्यामागचे कारण असं सांगतात की जंगलामध्ये जेव्हा आम्ही नदीचा मार्ग शोधत होतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आमच्या हातात नव्हत्या, परंतु दररोज दाढी करून छान दिसणं हे माझ्या हातात होतं आणि तीच गोष्ट मला खूप मोटीवेट करत होती. दररोज दाढी करणे ही एक साधी गोष्ट त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास भरत होती. त्यांना असं वाटायचं की सर्व गोष्टी ठीक होऊ शकतात. मी नदीचा मार्ग नक्कीच शोधून काढेल.तर मित्रांनो रिपीटेशन म्हणजेच काय की एखादी गोष्ट वारंवार केल्याने तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन ऑटोमॅटिक येऊन जातो. मित्रांनो या तीन गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील पाळाव्या लागतील. एक चांगली स्वयंशिस्त आणि आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी वरील गोष्टी कराव्या लागतील.

By Abhi

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *